सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड तालुक्यातील केळना (केळगांव) प्रकल्पातुन रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असुन, याकडे प्रशासनाने धडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे. केळगाव प्रकल्पातुन अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदि गावांची तहान भागवली जाते. मात्र केळना प्रकल्पातुन रात्रीच्या वेळेस अवैध रित्या पाणी उपसा केला जात आहे.
यामुळे दिवसें दिवस केळगांव प्रकल्पातुन पाण्याची पातळी खालवत असुन, या कडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पाणी टंचाईला सामना करावा लागणार आहे. शासन एकीकडे पाणी टंचाईवर उपाययोजना करत आहे, मात्र केळना प्रकल्पातुन रात्रीच्या सुमारास अवैध पाणी उपसा होत आहे. यावर प्रशासन धडक कारवाई का करत नाही ? असा प्रश्न नागरिकांकडुन केला जात आहे. संबंधीत विभागाने या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी अशीही मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.